नवी दिल्ली - गुजरातमधील अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील 6 जण घरामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळले आहेत. यामध्ये दोन प्रौढ आणि चार मुलांचा समावेश आहे. हा प्रकार हत्या की आत्महत्या या दोन्ही अंगांनी पोलीस तपास करत आहेत. या सर्वांनी आत्महत्या केल्याचा दावा मुलांच्या वडिलांनी पोलिसांकडे केला.
महाराष्ट्रातही चौघांची आत्महत्या
दरम्यान महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दाम्पत्याने आपल्या दोन लहान मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला आहे.