चेन्नई - राज्यातील नमक्कल जिल्ह्यात जीपच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बिहारमधील चार कामगारांचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात टाटा सुमो जीपचा चेंमामेंदा झाला आहे. सर्व मृतदेह कारमधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
सर्वजण नमक्कल येथून तिरची येथे जात असताना हा अपघात झाला.