ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक : पाचव्या टप्प्यात ७ राज्यांमध्ये उद्या मतदान; ८ कोटी मतदार बजावणार मताधिकार

author img

By

Published : May 5, 2019, 5:21 PM IST

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात एकूण ५१ लोकसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी सातही राज्यात जवळपास ९६ हजार ८८ मतदान केंद्रांची उभारणी निवडणूक आयोगाने केली आहे.

मतदान

नवी दिल्ली - देशातील मतदार सोमवारी पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणार आहे. दरम्यान देशातील ७ राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. उद्या येथील ८ कोटी ७६ लाख मतदार आपला मताधिकार बजवणार आहेत. उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर एक नजर....

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात एकूण ५१ लोकसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी सातही राज्यात जवळपास ९६ हजार ८८ मतदान केंद्रांची उभारणी निवडणूक आयोगाने केली आहे. या राज्यातून ४ कोटी ६३ लाख पुरुष आणि ४ कोटी १३ लाखच्या जवळपास महिला मतदान करतील. एवढेच नाही तर एकूण मतदारांमध्ये २ हजार २१४ मतदार हे तृतीयपंथी आहेत.

या सातही राज्यातून ५१ जागांसाठी ६७५ उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच ४८ उमेदवार मैदानात आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसचे ४६ आणि बसपचे ३३ उमेदवार निवडणुकीच्या रणधूमाळीत उभे आहेत. विशेष म्हणजे ५११ उमेदवार हे अपक्ष आहेत.

लोकसभेच्या या टप्प्यामध्ये बिहारच्या ५ जागा, जम्मू-काश्मीर येथील २, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशच्या आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी ७, राजस्थानमधील १२ आणि उत्तर प्रदेशच्या १४ मतदारसंघाचा समावेश आहे.

Intro:Body:

National NEWS 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.