नवी दिल्ली - देशभरात गेल्या १२ तासांमध्ये ५४७ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६,४१२ झाली आहे.
देशातील एकूण रुग्णांपैकी ५,७०९ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ५०४ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाच्या ३० नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा १९९ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
-
Increase of 547 new COVID19 cases 30 deaths in last 12 hours; India's total number of #Coronavirus positive cases rises to 6412 (including 5709 active cases, 504 cured/discharged/migrated and 199 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/N9fLxsqy4a
— ANI (@ANI) April 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Increase of 547 new COVID19 cases 30 deaths in last 12 hours; India's total number of #Coronavirus positive cases rises to 6412 (including 5709 active cases, 504 cured/discharged/migrated and 199 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/N9fLxsqy4a
— ANI (@ANI) April 10, 2020Increase of 547 new COVID19 cases 30 deaths in last 12 hours; India's total number of #Coronavirus positive cases rises to 6412 (including 5709 active cases, 504 cured/discharged/migrated and 199 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/N9fLxsqy4a
— ANI (@ANI) April 10, 2020
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (१,३६४) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ तामिळानाडू (८३४) आणि दिल्लीचा (७२०) क्रमांक लागतो. तर सर्वाधिक बळीदेखील महाराष्ट्रातच (९७) गेले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात (१७) आणि मध्य प्रदेशचा (१६) क्रमांक लागतो.
हेही वाचा : आधीच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची चणचण, त्यात ५० कंत्राटी डॉक्टरांचा राजीनामा..