पाटना (बिहार)- लग्न सोहळ्यातील जेवण खालल्याने जवळपास ५० वऱ्हाडी आजारी पडल्याची घटना सरन जिल्ह्यातील सोनपूर येथे सोमवारी घडली. यात मुलांचा देखील समावेश आहे. आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जवळपास ५० लोकांवर दवाखान्यात उपचार सुरू आहे. जेवणामुळे लग्न सोहळ्यातील इतर लोक देखील आजारी पडण्याची शक्यता असल्याने आम्ही लग्नस्थळी डॉक्टरांचे एक पथक पाठविले आहे, असे उपविभागीय अधिकारी एस.एस पांडे यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर, उपचार घेतल्यानंतर आजारी पडलेल्यांमधील काही लोक आपल्या गावी देखील परतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा- मुंबईच्या तरुणाचा इंदौरमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू