पुदुच्चेरी - शहरात मंगळवारी नव्याने ५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये एका ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली असल्याचे आरोग्यमंत्री मल्लाडी कृष्णा राव यांनी सांगितले.
राव म्हणाले, या व्यक्ती अबू धाबीहून पुदुच्चेरीतील माहे येथे आल्या होत्या, तर केंद्रशासित प्रदेशात मंगळवारपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 132 वर पोहोचली आहे. यापैकी 77 अॅक्टीवर रुग्ण आहेत, तर 55 जण बरे झाले आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी जनतेने आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आम्ही सद्यस्थितीत आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा करत असल्याचेही राव म्हणाले.
पुदुच्चेरी येथील इंदिरा गांधी या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांसाठी खाटांची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली असल्याचे राव यांनी सांगितले.
आरोग्य आणि परिवार कल्याण विभागाचे संचालक म्हणाले, आतापर्यंत 8 हजार 472 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यातील 8 हजार 292 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरीत अहवाल येणे बाकी आहे.