श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि लष्करादरम्यान झालेल्या चकमकीदरम्यान पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश मिळाले आहे. मात्र, या चकमकीत पाच जवानांना वीरमरण पत्करावे लागले आहे. याआधी मिळालेल्या माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये एक जवान हुतात्मा झाला होता. मात्र आता या संख्येत वाढ झाली आहे.
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये असलेल्या भारत-पाक सीमेवर ही चकमक झाली. ३ एप्रिलच्या रात्रीपासून काश्मीरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांदरम्यान ही चकमक सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शामस्बेरी रेंजमधून हे दहशतावादी भारतात शिरले होते. त्यानंतर ते पोसवालमधील गुज्जर ढोकमध्ये लपून बसले होते, अशी शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शनिवारी दक्षिण काश्मीरमधील बाटपुरा येथे सुरक्षादलाने 4 दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यामुळे गेल्या ४८ तासांमध्ये सुरक्षा दलांनी एकूण नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
हेही वाचा : COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..