लखनऊ- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. शहरातील सर्व कामधंदे बंद पडले आहेत. कामानिमित्त मोठ्या शहरांत गेलेल्या कामगारांना गावाकडे परत जावे लागत आहे. त्यामुळे कामगारांचे स्थलांतर वाढले आहे. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये पाच लाखाहून अधिक मजूर परत आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या परत आलेल्या कामगारांमुळे एक नवीन संकट समोर आले आहे. या स्थलांतरानंतर बुंदेलखंडमध्ये आगामी काळात आर्थिक संकट कोसळणार आहे, असे जल जन जोडो अभियान आणि परमार्थ संस्थेच्या माध्यमातून सांगितले जात आहे. झांसीमध्ये ईटीव्ही भारतने जल जन जोड अभियान अभियानाचे राष्ट्रीय संयोजक संजय सिंग यांच्याशी विशेष बातचित केली आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 12 वा दिवस आहे.