नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकझ तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 400 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळले ?
यातील सर्वात जास्त रुग्ण तामिळनाडू राज्यात सापडले असून राजस्थान 11, अंदमान निकोबार 9, दिल्ली 47, पुदुच्चेरी 2, जम्मू आणि काश्मीर 22, तेलंगणा 33, आंध्रप्रदेश 67 आणि 16 आसाममध्ये आढळले आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमामुळे भारतात कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजारांच्या जवळ पोहचला आहे. याप्रकरणी तबलीगी जमातचे प्रमुख मौलान साद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.