रांची - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमध्ये जमशेदपूर येथील जुगसलाई भागात काम करणाऱ्या वाले कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व कामगार बंगालचे रहिवासी असून ते जमशेदपूर येथे सोन्याच्या दागिने बनवितात. टाळेबंदीनंतर उत्पन्नचा साधन बंद झाल्याने जवळचे सर्व पैसे संपल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी शासनाने याकडे लक्ष देऊन मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लॉकडाऊनमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये विविध राज्यातील कामगार अडकले आहेत. ते सर्वजण संचारबंदी शिथिल कधी होईल याची वाट पाहत आहेत. जमशेदपूरच्या जुगसलाई भागातील ज्वेलर्स शॉपमध्ये काम करणारे 40 कारागीर संचारबंदीमुळे येथे अडकले आहेत. हे सर्व कारागीर सोनाराकडून ऑर्डर मिळाल्यानंतर काम करतात. पण, सध्या त्यांचे काम बंद असल्याने त्यांच्या खाण्या-पिण्याचीही भ्रांत झाली आहे.
हेही वाचा - परिवहन मंडळाच्या 71 बसचा ताफा कोटामध्ये दाखल, राज्यातील विद्यार्थ्यांना आजच स्वगृही आणणार