जयपूर - राजधानी आणि गुलाबी शहर जयपूर पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे दीड महिन्यांपासून शहरातील पर्यटनाला खिळ बसली आहे. पर्यटकांच्या जीवाववर अनेक छाटे व्यापारी आणि व्यावसायिक अवलंबून आहेत. ४० लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील दीड लाख नागरिक छोटा व्यवसाय करुन आपला उदनिर्वाह चालवतात. त्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ज्या दुकानदाराची कमाई ५०० रुपये आहे, आणि ज्याची ५ हजार सगळेच चिंतेत आहेत. लॉकडाऊनचा परिणाम सर्वांवर झाला आहे. लॉकडाऊन संपल्यावरही पर्यटन सुरू होण्यास किती काळ लागेल याची चिंता त्यांना आहे. पुन्हा सर्व सुरळीत केव्हा होईल याची दुकानदार आणि व्यावसायिक वाट पाहत आहेत. अनेकांना लॉकडाऊन असला तरी कर्मचाऱ्यांचे पगार आणि दुकानाचे भाडे द्यावे लागत आहे. उत्पन्न नसताना त्यांना हा खर्च करावा लागत आहे.
जयपूरमधील व्यापाराची स्थिती
शहरात २ लाख २५ हजार दुकानदार
५०० पेक्षा जास्त छोटे-मोठे बाजार
जवळपास ४ हजार कोटींचा व्यापारावर परिणाम