जोधपूर (राजस्थान) - जिल्ह्यातील झंवर पोलीस ठाण्याच्या परिसरातील लुणावास येथे मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण बस आणि तवेरा कारचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांनी समोरासमोर धडकी दिली. यात तवेरा गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीत काही जण अडकल्याचा अंदाज आहे.
अपघातानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. याची माहिती मिळताच झंवर पोलीस ठाण्याचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन बोलावले असून गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
तवेरा गाडीतील लोक झंवरवार पोलीस ठाणे परिसरातील लुनवास भागातून जोधपूरच्या दिशेने जात होते आणि बस बाडमेरकडे जात होती. त्याचवेळी या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. सध्या घटनास्थळी पोलिसांकडून गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती अजित गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.