भूवनेश्वर - ओडिशा राज्यातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 4 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी घनदाट जंगलामध्ये आज(रविवारी) कारवाई केली.
जिल्ह्यातील तुंमुदीबंधा या घनदाट जंगल परिसरात सकाळी पोलीस पथकाने शोधमोहिम राबवली. पोलीस नक्षलवाद्यांच्या तळावर पोहचताच त्यांनी गोळीबार सुरु केला. यावेळी चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरुन सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक अभय यांनी दिली.
मारले गेलेले चार नक्षलवादी बंसाधरा-नागवाली-घुमुसर विभागातील बंदी घालण्यात आलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या परिसरामध्ये सुरक्षा दलाकडून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी विरोधी ऑपरेशन राबविण्यात येत आहेत.