ETV Bharat / bharat

हाथरसमध्ये जातीय दंगलीचा कट, उत्तर प्रदेश पोलिसांची चौघांना अटक

हाथरस घटनेप्रकरणी जातीय दंगलीचा कट आखल्याप्रकरणी मथुरा पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

Hathras
उत्तर प्रदेश पोलीस
author img

By

Published : Oct 10, 2020, 6:22 PM IST

मथुरा - हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. महिला अत्याचाराचे प्रकरण नीट हाताळले नसल्याचे म्हणत काँग्रेससह विरोधी पक्षांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला होता. तर, या घटनेवरून सरकारची बदनामी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून कट आखला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर हाथरसमध्ये जातीय दंगलीचा कट आखल्याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे.

मथुरा पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींकडील मोबाईल, पत्रके, डायरी जप्त केली आहे. अतिकूर रहमान, आलम, सिद्दीकी आणि मसूद अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. रेहमान, आलम आणि मसूद हे राज्यातील अनुक्रमे मुझ्झफनगर, रामपूर आणि बहारिच जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर सिद्दीकी केरळ राज्यातील मल्लपूरम येथील आहे.

अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. मथुरा पोलिसांची दोन पथके याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. चौघा आरोपींचा आंतरराष्ट्रीय निधीशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

गावातील चार सवर्ण तरुणांनी हाथरसमधील दलित तरुणीवर शेतामध्ये बलात्कार केला. गंभीर अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशभरात आंदोलन पेटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.