ETV Bharat / bharat

इंदूरमधील कोरोना बाधित रुग्ण पळाले; पोलिसांनी घेतले ताब्यात - इंदूरमधील कोरोना रूग्ण पळाले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 2 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे आणि अन्य 2 जण संशयित आहेत. अटक करण्यात आलेल्या एकूण 6 जणांना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हे चारही जण तबलिगीशी संबंधित असल्याची माहिती आहे.

इंदूर कोरोना बातमी
इंदूर कोरोना बातमी
author img

By

Published : Apr 17, 2020, 3:28 PM IST

मुरैना (मध्यप्रदेश) - इंदूर येथील पळ काढलेल्या कोरोना रुग्णांना सराय छोला पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व रुग्ण केळी घेऊन जाणाऱ्या एका ट्रकमधून पळून जात होते. यात एकूण चार रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच ट्रकचालक, वाहकास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 2 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे आणि अन्य 2 जण संशयित आहेत. अटक करण्यात आलेल्या एकूण 6 जणांना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हे चारही जण तबलिगीशी संबंधित असल्याची माहिती आहे.

इंदूर येथून 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पळाल्यानंतर राज्याताल पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आली होती. मुरैना येथील सराय छौला पोलीस ठाण्याचे प्रभारी योगेंद्र यादव यांनाही ही हे रुग्ण पळाल्याची माहिती मिळाली होती. हे रुग्ण एका ट्रकमध्ये दिल्लीच्या दिशेने पळाल्याची माहिती होती. यानंतर राष्ट्रीय महामार्गाजवळील राजघाटजवळ राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर असलेल्या अल्लाबेली चौकीवर चेकिंग पॉइंट लावण्यात आला.

हेही वाचा - संचारबंदीचे उल्लंघन भोवले; परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर गेलेल्या तीन अधिकाऱ्यांना नोटीस

धौलपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला रूग येथील चेकिंग पॉइंटवर थांबवण्यात आला. यावेळी त्याची तपासणी केली असता, या पळून जाणाऱ्या रुग्णांना ताब्यात घेण्यात आले. रुग्णांसोबत ट्रकच्या चालक आणि वाहकासही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, ते संबंध तबलीगीशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. यानंतर रुग्णांना रुग्णवाहिकेतून या सहाही जणांना जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. याठिकाणी यासर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. हे चारही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. ते इंदूर येथून पळाले होते आणि मुरैना येथे गहू कापण्यासाठी आले आहेत, असेही त्यांनी मुरैना जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी गजेंद्र तोमर यांना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.