भोपाळ - लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या ३६५ काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येणार आहे. आज शनिवारी दुपारी २ वाजता १८ वातानुकुलित बसेस विद्यार्थ्यांना घेऊन काश्मीरला रवाना होणार आहेत.
विद्यार्थ्यांना सध्या भोपाळमधील गांधीनगर येथील खासगी शाळेत ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तरुण पिठोडे यांनी आपल्या इतर सहकार्यांसोबत शुक्रवारी शाळेला भेट दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांची सोय व्यवस्थित होत आहे की नाही? याबाबत पाहणी केली. तसेच इंदूर येथे देखील काही काश्मिरी विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांना लवकरच त्यांच्या राज्यात पाठवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दिग्विजय सिंह यांनी गृहमंत्र्यांना लिहिले होते पत्र -
जम्मू-काश्मीर केंद्र सरकारच्या अख्त्यारित येते. त्यामुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात पोहोवणे हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच मध्यप्रदेशातील विविध भागात अडकलेल्या ४०० काश्मिरी विद्यार्थ्यांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारने व्यवस्था करावी याबाबत सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देखील लिहिले होते.