नवी दिल्ली - येथील पटपडगंज येथील मॅक्स हॉस्पिटलमधील 2 डॉक्टर्स, 23 नर्सिंग स्टाफ सहित एकूण 33 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील अनेक हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहेत. यात ज्याठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार होत नाही आहेत, अशा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्व कोरोनाबाधितांना साकेत येथील मॅक्सच्याच हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मॅक्स येथे उपचारासाठी आलेला एक रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळले होते. यानंतर येथील नर्सिंग स्टाफमधील एकूण 145 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आणि त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर या सर्व लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आला होता. यानंतर आता सापडलेले 33 कोरोनाबाधित तेथीलच आहेत.
हेही वाचा - देशात 24 तासात आढळले 1 हजार 990 कोरोनाबाधित, तर 49 जण दगावले
तर मॅक्स हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर सोबत 3 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मॅक्स हेल्थ केअरने तेथील 24 हजार कर्मचारी आणि 1000 रूग्णांची नमुना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता हळूहळू सर्वांचे अहवाल येत आहेत. यामध्ये मॅक्सशी संबंधित अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.