जयपूर- राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. आज सकाळी ९ वाजेपर्यंत कोरोनाची ३१ नवी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यानंतर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ८०३ वर पोहोचला आहे. त्याचबरोर, आज कोरोनामुळे २ लोकांचा मृत्यू झाला असून मृतकांचा आकडा ७० एवढा झाला आहे.
आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार आज प्रतापगढ मध्ये २, उदयपूरमध्ये ५, जयपूरमध्ये ८, जोधपूरमध्ये ९, अजमेरमध्ये २, चितौडगढमध्ये ३, कोटामध्ये १, डुंगरपूरमध्ये १ कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहेत. त्याचबरोबर, जयपूरमध्ये २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इरानमधून आलेले ३१ भारातीय, इटलीतून आलेले २ आणि इतर राज्यातून आलेले २ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
राज्यात आतापर्यंत १ लाख १४ हजार ४११ नागरिकांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ५ हजार १८२ नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आला असून ६ हजार ४५७ लोकांचा अहवाल अजून यायचा आहे. तसेच, १ हजार २४२ कोरोनाबाधितांची परत चाचणी करण्यात आली होती, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ज्यानंतर ८२५ नागरिकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रिचूर पोरम दिनी भगवान वडक्कमनाथन यांची भू्मी शांत