ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी एका मोटारीतून तीन रिव्हॉल्वर जप्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बोगदा उद्घाटन

पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना एका वाहनावर 'पायलट' लिहिलेले आढळले. चालकासह तीन प्रवाशांना पकडले असून ही रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 25 आणि 27 च्या अन्वये एफआयआर दाखल करून मनाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बोगदा उद्घाटन

author img

By

Published : Sep 30, 2020, 6:40 PM IST

कुल्लू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिमाचल प्रदेश दौर्‍याच्या तीन दिवस आधी कुल्लू जिल्ह्यातील मनाली येथे एका व्यक्तीकडून विनापरवाना रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 3 ऑक्टोबर रोजी कुटलू जिल्ह्यातील मनाली आणि लाहौल-स्पीती जिल्ह्यातील लाहौल व्हॅली येथे पंतप्रधान रोहतांगच्या अटल बोगद्याच्या उद्घाटनासाठी येत आहेत.

पोलिसांनी प्रिणी येथील नामांकित उद्योगपतीच्या कारमधील तीन रिव्हॉल्व्हर्स जप्त केली. यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी चार जणांना अटक केली आहे. यापैकी दोन रिव्हॉल्व्हरचा परवाना आहे. तर, एक बेकायदेशीर आहे. हे रिव्हॉल्व्हर्स राज्यस्तरीय परवाने असलेले आणि हरियाणामध्ये बनविलेले आहेत. प्रिणीमधील वाहनांच्या तपासणीदरम्यान पोलीस आणि सुरक्षा संस्थांना ही माहिती मिळाली. एका वाहनात तीन शस्त्रे सापडल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हेही वाचा - रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिक करणार 3,675 कोटी रुपयांची गुंतवणूक

'पंतप्रधानांच्या भेटीशी संबंधित संशयास्पद काहीही उघड झाले नाही. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील रहिवासी बलजीत सिंग (37) याच्याकडून परवाना नसलेले रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे,' असे कुल्लूचे एसपी गौरव सिंह म्हणाले.

पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना एका वाहनावर 'पायलट' लिहिलेले आढळले. चालकासह तीन प्रवाशांना पकडले असून हे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 25 आणि 27 च्या अन्वये एफआयआर दाखल करून मनाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - विजय मल्ल्याच्या कंपनीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ८ ऑक्टोबरला सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.