ETV Bharat / bharat

उदयपूरमध्ये एकाच दिवशी ३ लोकांना कोरोना व्हायरसची बाधा

उदयपूरमध्ये एकाच दिवशी तीन रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर प्रशासन संक्रमण फैलू नये यासाठी रुग्णांची ट्रॅवल हिस्ट्री धुंडाळण्याच्या कामाला लागली आहे.

-corona-infected-in-udaipur
३ लोकांना कोरोना व्हायरसची बाधा
author img

By

Published : Apr 3, 2020, 4:51 PM IST

उदयपूर - जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. शहरामध्ये गुरुवारी एक रुग्ण सापडला होता. आज शुक्रवारी तीन नवे रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन हादरले आहे. उदयपूरमध्ये कोरोना संक्रमित झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. त्यांना प्रशासनाने आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.

राजस्थानातील कोरोना संक्रमित झालेल्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. गुरूवारी एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर शुक्रवारी तिघांच्या कोरोना व्हायरस चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यातील एक रुग्ण अलिकडेच इंदूरहून आला होता. त्यानंतर त्याला प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये ठेवले होते.

३ लोकांना कोरोना व्हायरसची बाधा

कोरोना व्हायरसची लक्षणे जाणवल्यामुळे त्याची गुरूवारी चाचणी करण्यात आली. यात तो पॉझिटीव्ह आढळला. त्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आयसोलेट करण्यात आले होते. अशात आता शुक्रवारी त्यातील तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

शुक्रवारी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्यामध्ये एक जण उदयपूरच्या महाराणा भोपाल चिकित्सालयामध्ये स्वाईन फ्ल्यू वॉर्ड इन्चार्ज आहे. यामुळे रुग्णालयाला हादरा बसला. त्यानंतर आता संपूर्ण वॉर्ड आता सॅनिटाइझ करण्यात आला आहे. तर प्रशासन संक्रमण फैलू नये यासाठी रुग्णांची ट्रॅवल हिस्ट्री धुंडाळण्याच्या कामाला लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.