ETV Bharat / bharat

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण.. - Indian Medical Association employee COVID-19

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांना तापाचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली होती. सोमवारी या चाचणीचा अहवाल आल्यानंतर तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या तिघांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

3 employees of Indian Medical Association found corona positive
भारतीय वैद्यकीय संघटनेच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण..
author img

By

Published : Jun 9, 2020, 4:30 AM IST

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता, भारतीय वैद्यकीय संघटनेच्याच तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीच्या आयटीओमध्ये असणाऱ्या वैद्यकीय संघटनेच्या मुख्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांना तापाचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली होती. सोमवारी या चाचणीचा अहवाल आल्यानंतर तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या तिघांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण..

या तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. त्यामुळे त्याला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. यासोबतच, या तिघांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणेही सुरू आहे.

हेही वाचा : अयोध्येत 10 जूनपासून राम मंदिर निर्माणाला होणार सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.