दंतेवाडा (छत्तिसगड) - सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या लोन वर्राटू मोहिमेमुळे 27 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. रविवारी छत्तीसगढ राज्य स्थापनेच्या दिवशी या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या 27 नक्षलवाद्यांपैकी पाच जणांवर पाच लाखांचे बक्षीस होते.
27 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
दंतेवाडाचे एसपी अभिषेक पल्लव यांनी याबाबत अधिक माहिती दिली, की या मोहिमेदरम्यान प्रत्येक गावागावात बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून आत्मसमर्पणाचे आवाहन, ज्यावर प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले जात होते. यानंतर 27 नक्षलवाद्यांनी सेकंड इन कमांड सौरभ कुमार, डेप्युटी कमाडंट पूरनमल, पोलीस उपअधीक्षक शिल्पा साहू यांच्या समोर आत्मसमर्पण केले. एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले, की चार महिन्यांपासून सुरु असलेल्या लोन वर्राटू या मोहिमेत पोलिसांना आता यश मिळाले आहे. गेल्या चार महिन्यात 177 जणांनी नक्षलवादाचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले आहे. तसेच आत्मसमर्पण केलेले सगळेजण अतिसंवेदनशील भागातील आहेत. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. त्या सगळ्यांना प्रोत्साहनपर दहा हजार रुयांचे बक्षीस देण्यात आले आहे.