नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात दिल्लीत दरोडेखोर, स्नॅचर्स, चोरटे अशा एकूण 251 गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली. असुरक्षित ठिकाणांचा आणि चोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा आढावा घेतल्यानंतर वाहतूक आणि स्थानिक पोलिसांना संबंधित ठिकाणांवर तैनात करण्यात आले.
याठिकाणांवर तैनात असणाऱ्या स्टाफने येणा-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली. यातून २५१ गुन्हेगारांना अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले. गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या उत्तर विभागातील संबंधित जिल्हा प्रमुखांच्या देखरेखीखाली विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे.
ही पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. यात मध्यवर्ती, उत्तर, उत्तर-पश्चिम, बाह्य-उत्तर, रोहिणी, पूर्व, उत्तर-पूर्व आणि शाहदारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासंबंधी एफआयआर नोंदविण्यासाठी आणि तातडीने कारवाई करण्यासाठी न्यायाधिकार क्षेत्राचा मुद्दा येऊ नये यावर जोर देण्यात आला आहे.