हैदराबाद – मिलिट्री कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (एमसीईएमई) 23 अधिकाऱ्यांना अभियांत्रिकीची पदवीप्रदान करण्यात आली. ही पदवी जनरल ऑफिसर, लेफ्टनंट जनरल राज शुक्ला, वायएसएम, एसम यांनी प्रदान केली. पदवी मिळालेले अधिकारी हे टेक्निकल इंट्री स्किममधून तंत्रज्ञानाची पदवी उत्तीर्ण झाले आहेत.
एमसीईएमई ही संस्था सैन्य दलाच्या आर्मी ट्रेनिंग कमांड आणि ट्रेन्स इंजिअरिंगचा (एआरटीआरएसी) भाग आहे. याविषयी माहिती देताना एमसीईएमईचे कमांडट लेफ्टनंट जनरल टीएसए नारायण म्हणाले, की आमच्याकडे चांगले गुणवत्ताधारक आणि स्वयंप्रेरित शिक्षक कर्मचारी आहेत. लॅब, इंटिग्रेटेड वर्ग आणि माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा आहेत. नुकतेच महाविद्यालय हे नॅशनल नॉलेज नेटवर्कशी जोडण्यात आले आहे. आयआयटी, आयआयएम, आयएसबी, जेएनयू, जेएनटीयू हैदराबादप्रमाणे संस्था विकसित करण्यासाठी काम सुरू आहे. महाविद्यालयाला गोल्डन पिकॉक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
असे आहे एमसीईएमई काम-
एमसीईएमईची 1953 मध्ये स्थापना झाली आहे. सैन्यदलाच्या संस्थात्मक प्रशिक्षणासाठी एआरटीआरएसी ही सैन्यदलाची केंद्रीय संस्था कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत महाविद्यालयाचे काम चालते. सैन्यदलाला लागणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्याचे काम एमसीईएमई करते.
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये सैन्यदलाच्या अभियंत्यांनी कमी वेळेत कठीण असा पूल तयार करून यश मिळविले होते.