नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी 22 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. तुकडी क्रमांक 138 मधील जवानांना कोरोनाची बाधा झाली असून त्रीपूरामध्ये एकूण कोरोनाबाधित 64 झाले आहेत.
22 कोरोनाबाधित जवानांमध्ये 18 पूरुष, 1 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे. धलाई जिल्ह्यातील राज्य सरकारने धलाई जिल्हा रेड झोन म्हणून घोषित केला आहे. बटालियन मुख्यालय, गंडाचेरा येथे एक बेस कॅम्प आणि करीना येथे बांगलादेशला लागणारी सीमा चौकी अशी तीन ठिकाणे कन्टेंन्मेट झोन म्हणून घोषीत केली आहेत.