जयपूर - गुजरातमधील कच्छ येथे झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 19 वर्षे पूर्ण झाली. या भूकंपाला भुज भूकंप म्हणूनही ओळखले जाते. या आपत्तीमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांचे जीव गेले होते आणि लाखोंच्यावर घरे उद्ध्वस्त झाली होती.
गुजरातमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 19 वर्षे पूर्ण -
गुजरातमधील कच्छ येथे झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 19 वर्षे पूर्ण झाली.
जयपूर - गुजरातमधील कच्छ येथे झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 19 वर्षे पूर्ण झाली. या भूकंपाला भुज भूकंप म्हणूनही ओळखले जाते. या आपत्तीमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांचे जीव गेले होते आणि लाखोंच्यावर घरे उद्ध्वस्त झाली होती.
गुजरात : कच्छ येथे झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 19 वर्षे पूर्ण
जयपूर - गुजरातमधील कच्छ येथे झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 19 वर्षे पूर्ण झाली. या भूकंपाला भुज भूकंप म्हणूनही ओळखले जाते. या भूकंपामध्ये हजारोंच्या संख्येने लोकांचे जीव गेले होते आणि लाखोंच्यावर घर उध्वस्त झाली होती.
सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी हा भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल एवढी होती. 1819 आणि 1956 मध्ये झालेल्या भूकंपानंतर हा तिसरा मोठा भूकंप झाला होता. कच्छ जिल्ह्य़ातील भाचाऊ येथील चाबोरी गावामध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. परंतु भूकंपाचा परिणाम 700 कि.मी.पर्यंत जाणवला होता. या विनाशकारी भूकंपामध्ये सुमारे २० हजार नागरिक ठार झाले होते.
भूकंप झाल्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येण्यास अनेक वर्ष लागली. या भुकंपाने एकूण २१ जिल्हे बाधित झाली होती. त्यामध्ये 18 मोठी शहरे, 182 तालुके आणि 904 गावांचा समावेश होता. भुज, भाचाळ, अंजार आणि रापार ही गावे ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. या भुकंपामधून वाचलेल्या लोकांना आजही पूर्वीच्या आठवणींनी हादरा बसतो.
भूकंप आल्यास हे करावे-
तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये आहात तर जमीनीवर बसा आणि मजबूत फर्निचरखाली जाऊन बसावे. तसेच भूकंपाच्यावेळी इमारतीबाहेर असाल तर झाड, खांब, आणि विजेच्या तारेपासून लांब रहावे. आपल्या घरात नेहमी आपत्कालीन कीट ठेवावी.
Conclusion: