जयपूर - राजस्थानमधील जयपूरच्या जेके लोन रुग्णालयामध्ये कोरोनामुळे एका 20 दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जगातील ही पहिलीच घटना आहे की, कोरोना विषाणूमुळे एवढ्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.
जे.के.लोन रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 मे ला चांदपोल येथील एका कुटुंबीयांनी आजारी असल्यामुळे या मुलाला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, विविष्ट आजाराने या मुलाचा सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने मुलाचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता, रात्री उशिरा या मुलाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे.
हेही वाचा - COVID-19 : गेल्या २४ तासांमध्ये आढळले २,२९३ रुग्ण; आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक वाढ..
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, 1 मे ला पहाटे 4 वाजता मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सकाळी 9 वाजता मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे इतक्या लहान वयातील जगातील हा पहिला मृत्यू आहे.