ETV Bharat / bharat

आंध्रप्रदेश : खासगी आराम बस व ट्रॅक्सचा भीषण अपघात, १५ जण ठार

हैदराबाद येथून बेंगळुरुकडे वोल्वो बस जात होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या ट्रॅक्स व बसमध्ये आपघात झाला.

आंध्रप्रदेश : बस आणि ट्रॅक्सच्या अपघातात १४ जण ठार
author img

By

Published : May 11, 2019, 7:43 PM IST

Updated : May 11, 2019, 11:26 PM IST

कुरनुल - वोल्वे बस आणि ट्रॅक्समध्ये झालेल्या भीषण अपघातात १५ जण ठार झाले. हा अपघात कुरनुल जिल्ह्यातील वेलदुर्ती येथे झाला.

आंध्रप्रदेश : खासगी आराम बस व ट्रॅक्सचा भीषण अपघात, १४ जण ठार

हैदराबाद येथून बेंगळुरुकडे वोल्वो बस जात होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या ट्रॅक्स व बसमध्ये आपघात झाला. स्थानिक लोकांनी लगेच अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. अपघात झालेली बस ही एसआरएस कंपनाची असल्याचे पोलिसांना आढळले.

अपघातात मृत झालेले लोक हे जोगुलम्बा गडवाळा जिल्ह्यातील रामापुरम या गावातील रहिवासी आहेत. मृत झालेले लोक हे अनंतपूर येथील गुंटकल्लू येथे विवाह ठरवण्यासाठी जात होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते ट्रॅक्सने घरी परतत असताना वेलदुर्ती चेक पोस्ट येथे अपघात घडला.

वेलदुर्ती चेक पोस्ट येथे ट्रॅक्स जात असताना विरुध्द दिशेने खासगी बस येत होती. समोरुन येणाऱ्या दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात बस दुभाजक ओलांडून ट्रॅक्सला धडकली. या अपघातात १३ जण जागीच ठार झाले तर दोघांचा मृत्यू रुग्णालयात उपचारासाठी घेऊव जात असताना झाला.

खासगी बसमधील काही प्रवासी देखिल जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 11, 2019, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.