अमरावती - लॉकडाऊनमुळे बिहारचे बाराशे मजूर आंध्रप्रदेशातील गुटुंर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. घरी जाण्याची व्यवस्था करावी यासाठी मजूरांनी बिहार सरकार तसेच पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना करत आहेत. सर्वजण रोजंदारीवर काम करणारे असल्याने हाताचे काम गेले आहे. काम बंद झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने आमची माघारी जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मजूरांनी केली आहे.
उपासमारीची वेळ
सुमारे बाराशे मजूर गुंटुर जिल्ह्यात रोजंदारीवर काम करतात. लॉकडाऊनमुळे सर्वांचे काम गेले आहे. स्थानिक प्रशासानाने त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केल्याचा दावा केला आहे. मात्र, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे कामगार सांगतात. घरी जाण्यासाठी आम्ही नोंदणीही केली आहे. मात्र, आम्हाला घरी जाण्यास परवानगी दिली जात नाही, असे मजूर सांगतात.
देशातील इतर राज्यातून मजूरांना माघारी घरी नेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, आंध्रप्रदेश आमची काहीही व्यवस्था करत नाही. काम बंद झाल्याने पैस मिळत नाही. खोलीचे भाडे मात्र, द्यावे लागत आहे. मात्र, ते देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, असे समस्तीपूर येथील एका मजूराने सांगितले.