नवी दिल्ली - सरकारी विमान वाहतूक सेवा एअर इंडियाच्या पायलट कर्मचाऱ्यांना गळती लागली आहे. पगार वाढ आणि बढती मनाप्रमाणे होत नसल्याने १२० पायलटांनी राजीनामा दिला आहे. आमच्या मागण्या खूप दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्या पूर्ण करण्याचे आश्वासन आधी व्यवस्थापनाने द्यावे, असे राजीनामा दिलेल्या एका कर्मचाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
-
Air India faces mass resignation ahead of divestment
— ANI Digital (@ani_digital) October 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/Zqas8yLm5f pic.twitter.com/HEAPBInQBS
">Air India faces mass resignation ahead of divestment
— ANI Digital (@ani_digital) October 13, 2019
Read @ANI story | https://t.co/Zqas8yLm5f pic.twitter.com/HEAPBInQBSAir India faces mass resignation ahead of divestment
— ANI Digital (@ani_digital) October 13, 2019
Read @ANI story | https://t.co/Zqas8yLm5f pic.twitter.com/HEAPBInQBS
हेही वाचा- 'या' माय-लेकांनी मन जिंकलं; पाहा बातमी वाचताना लाईव्ह टीव्हीवर काय झालं...
एअर इंडिया आधीच ६० हजार कोटी कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एअर इंडियाचे समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडिया अधिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 'एअरबस A- ३२०' या विमानसेवेच्या १२० पायलटांनी राजीनामा दिला आहे. आम्हाला कर्जाचे हप्ते चुकवण्यासाठी पैशांची गरज आहे, मात्र, आम्हाला आमचा पगारही काढता येत नाही, असे राजीनामा दिलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.
हेही वाचा- संतापजनक! अर्भकाचा मृतदेह कुरतडत होते कावळे, पलामू रुग्णालयातील प्रकार
एअर इंडियाने आधी आम्हाला कमी पगारामध्ये ५ वर्षांच्या करारावर कामावर घेतले. अनुभव मिळाल्यानंतर पगारात वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, आमची निराशा झाली, असे एका कर्मचाऱ्यांने सांगितले. इंडिगो एअर, विस्तारा, एअर एशिया, इंडियन एअरलाईन्स, गो एअर या विमान कंपन्याही 'एअर बस A- ३२०' ही विमाने वापरतात. त्यामुळे दुसरीकडे काम मिळण्याचा विश्वास राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे विमान सेवेवर परिणाम होईल का? असे, इअर इंडियाच्या प्रवक्त्याला विचारले असता, एअर इंडियाकडे प्रमाणापेक्षा अधिक पायलट असून अडचण येणार नाही, सद्य स्थितीत एअर इंडियाकडे २ हजार पायलट आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.