ETV Bharat / bharat

बांगलादेशमधील १२ तबलिगींवर गुन्हा दाखल.. - बांगलादेश तबलिगी जमात गुन्हा

या १२ नागरिकांना शामलीमधील ठाना भवन गावातील एका महाविद्यालयामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

12 Tablighi members from Bangladesh booked for Foreigners Act violation
बांगलादेशमधील १२ तबलिगींवर गुन्हा दाखल..
author img

By

Published : Apr 4, 2020, 12:49 PM IST

लखनऊ - दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या १२ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या शामली जिल्हा पोलीसांनी ही कारवाई केली आहे. या लोकांवर परदेशी कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्वांना ताब्यात घेऊन प्रशासकीय विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या १२ नागरिकांना शामलीमधील ठाना भवन गावातील एका महाविद्यालयामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

यासोबतच, या दोघांना मशीदीमध्ये लपवून ठेवणाऱ्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील भासानी गावामधील एका मशीदीमध्ये या १२ जणांना लपवून ठेवण्यात आले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत या लोकांना ताब्यात घेतले होते.

हेही वाचा : तेलंगाणात एकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस हवालदार निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.