जयपूर - जोधपूर जिल्ह्यातील शेरगड येथे झालेल्या ट्रेलर आणि पिकअपच्या धडकेत 11 लोकांचा मृत्यू झाला तर तीन लोक जखमी झाले. मृतांमध्ये 4 पुरुष, 6 महिला आणि एका मुलाचा समावेश असून सर्वजण बालोतराचे रहिवासी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
क्रेनच्या सहाय्याने वाहनांखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. सोयींतरा गावाजवळ मेगा हायवेवर हा अपघात झाला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघाताबाबत ट्विटरवर शोक व्यक्त केला.