ETV Bharat / bharat

केरळमधील 10 वर्षाच्या सान्वीने बनविले एका तासात 30हून अधिक पदार्थ - asia book of records

केरळमधील 10 वर्षाच्या सान्वीने बनविले एका तासात 33 पदार्थ बनवत एक विक्रम प्रस्थापित केला. तिने वयाच्या 10 वर्ष आणि 6 महिने आणि 12 दिवस पूर्ण केले असताना 29 ऑगस्टला हा विक्रम आपल्या नावावर केला. तिच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यात करण्यात आली आहे, अशी माहिती तिच्या परिवाराने दिली.

sandwich
सॅंडविच
author img

By

Published : Oct 11, 2020, 9:12 PM IST

कोची (केरळ) - दहा वर्षाच्या मुलीने एका तासांत 30 अधिक वेगवेगळे पदार्थ बनवत विक्रम केला आहे. यात तिने उत्तपम, फ्राईड राईस, चिकन रोस्ट असे पदार्थ बनवले. सान्वी एम प्रजित असे या मुलीचे नाव आहे. ती एर्नाकुलम येथील भारतीय हवाई दलातील विंग कमांडर प्रजित बाबू आणि मंज्मा हेलिंग यांची कन्या आहे. तिच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यात करण्यात आली आहे, अशी माहिती तिच्या परिवाराने दिली. एक लहान मुलाच्या वयाने सर्वाधिक पदार्थ बनविण्याचा विक्रम तिने प्रस्थापित केला आहे.

सान्वीने इडली, कॉर्न फ्रीटर्स, मशरुम टिक्का, उत्तपम, पनीर टिक्का, सँडविच, पपडी चाट, फ्राई़ड राईस, चिकट रोस्ट, अप्पम यासह एकूण 33 पदार्थ बनवले. तिने वयाच्या 10 वर्ष आणि 6 महिने आणि 12 दिवस पूर्ण केले असताना 29 ऑगस्टला हा विक्रम आपल्या नावावर केला.

द एशिया बुकच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन हा स्वयंपाकाचा कार्यक्रम पाहिला. हा कार्यक्रम विशाखापट्टणम येथील तिच्या घरी आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन गॅझेटेड अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती सान्वीची आई मंजीमा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

सान्वी म्हणाली, ती तिच्या कुटुंबाच्या, मित्र आणि हितचिंतकांच्या सहकार्याने ही कामगिरी करण्यास सक्षम होती. तिच्या आईने स्टार शेफ आणि रिअ‌ॅलिटी कुकरी शोची (कार्यक्रम) अंतिम फेरी गाठली होती. यामुळे सान्वी तिच्या आईपासून प्रेरणा घेतली होती. सान्वी नेहमीच स्वयंपाकघरात रमलेली असते. आई आणि आजी-आजोबांबरोबर अगदी लहान वयातच स्वयंपाक करायला लागली होती, अशी माहिती तिच्या आईने दिली.

सान्वीनेही मुलांच्या कुकरी कार्यक्रमात भाग घेतला आहे. तसेच पाक क्षेत्रातील स्पर्धांही ती जिंकली आहे. तिचे एक यूट्यूब चॅनेलही आहे. ज्यात ती साध्या आणि चवदार पदार्थ प्रदर्शन करते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.