नवी दिल्ली - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या जवळ रावळपिंडी शहरातील लष्करी रुग्णालयात रविवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर मृत पावल्याचे बोलले जात आहे.
इस्लामाबादच्या जवळ रावळपिंडी शहरातील लष्करी रुग्णालयात बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात जवळपास 10 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत आहे. तर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर देखील याच रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
पाकिस्तानमधील सामाजिक कार्यकर्ते एहसान-उल्लाह-मियाखेल यांनी ट्विटच्या माध्यमातून हे वृत्त दिले आहे.
भीषण बॉम्बस्फोटानंतर 10 जणांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. या घटनेचे वार्तांकन करु नये, असे पाकिस्तानी माध्यमांना लष्काराकडून बजावण्यात आल्याची माहिती आहे.
रावळपिंडीच्या लष्करी रुग्णालयातील स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या भीषण बॉम्बस्फोट मसूद अझहर खात्मा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही.