चेन्नई - तामिळनाडू राज्यातील विल्लुपूरम येथे झालेल्या बस आणि टेम्पोच्या धडकेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ७ जण झारखंड येथील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण २६ प्रवासी होते. तर, टेम्पोतून १४ जण प्रवास करत होते. बस आणि टेम्पोची समोरासमोर जोरात धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की या धडकेत ड्रायव्हरसह इतर ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, २ दोघांचा रुग्णालयात उपचार करताना मृत्यू झाला. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्यांपैकी ११ जण उत्तर भारतीय होते. तर, मृत झालेल्यांपैकी ७ जण झारखंड येथील आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.