नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्यात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांचा गटाने आज दिल्लीत भाजप प्रवेश केला आहे. यावेळी भाजप कार्यकारिणीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गोवा मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे.
-
Delhi: 10 Congress MLAs from Goa join BJP in presence of BJP Working President JP Nadda & Goa CM Pramod Sawant. pic.twitter.com/VFVxKrymrT
— ANI (@ANI) July 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: 10 Congress MLAs from Goa join BJP in presence of BJP Working President JP Nadda & Goa CM Pramod Sawant. pic.twitter.com/VFVxKrymrT
— ANI (@ANI) July 11, 2019Delhi: 10 Congress MLAs from Goa join BJP in presence of BJP Working President JP Nadda & Goa CM Pramod Sawant. pic.twitter.com/VFVxKrymrT
— ANI (@ANI) July 11, 2019
दिल्लीतील भेटीनंतर ते गोव्यात परतणार असून त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदल आणि शपथविधी होणार आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू कवळेकर यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाचे मंत्रीपद काढून घेतले जाईल आणि घटकपक्षांकडे किती मंत्रिपदे राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. .