ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल; पाहा खास व्हिडिओ

मी कन्याकुमारीहून पायी काश्मीरला आलो आहे. या प्रवासात मी पाहिले भाजप आणि आरएसएसच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. हे भयंकर आहे. असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. आज गुरुवार (दि. 19 जानेवारी)रोजी भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली. त्यानंतर ते बोलत होते.

author img

By

Published : Jan 19, 2023, 2:40 PM IST

Updated : Jan 19, 2023, 8:47 PM IST

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल

जम्मू : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. त्यानंतर बोलताना राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) द्वेष पसरवत आहेत. तसेच, मी कन्याकुमारीहून पायी काश्मीरमध्ये आलो आहे. भाजप आणि आरएसएसच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. सरकार मोठ्या प्रमाणावर जनतेचा खिसा कापत आहे. आपले लक्ष दुसरीकडे वळवले जाते आणि आपल्याला लुटले जाते असा घणाघाती आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.

मीडिया लोकांचे लक्ष विचलित करत आहे : जम्मू-काश्मीरमधील एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी द्वेष, हिंसाचार, बेरोजगारी आणि महागाई या देशाच्या मुख्य समस्या असल्याचे म्हटले आहे. तसेच, प्रसारमाध्यम या गोष्टी दाखवत नाही असा थेट प्रहार राहुल यांनी यावेळी केला आहे. मीडिया लोकांचे लक्ष वळवण्यासाठी बॉलीवूड स्टार्स-ऐश्वर्या राय आणि अक्षय कुमार सारख्या विषयांचा वापर करतात असही राहुल यावेळी म्हणाले आहेत.

देशभरातील नेत्यांना निमंत्रण : राहुल गांधी जम्मूहून उधमपूरमार्गे बनीहालला पोहोचतील आणि त्यानंतर अनंतनागमार्गे श्रीनगरच्या पंथ चौकात पोहोचतील. खोऱ्यात राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर येथे मोठी रॅली काढण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. जम्मू-काश्मीर व्यवहार प्रभारी रजनी पाटील यांनी सांगितले की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे यांनी देशभरातील २३ राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून श्रीनगरला येण्याचे निमंत्रण दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या ज्या नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे आणि यात्रेत सहभागी होणार आहेत त्यात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, एमवाय तारिगामी (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) आणि मुझफ्फर शाह (एएनसी) यांचा समावेश आहे.

यात्रेसाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था : खोऱ्यात भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंग म्हणाले की, भारत जोडो यात्रेसाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून तयारी सुरू आहे. यात्रेसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा सेवा पुरवल्या जातील. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांकडून यात्रेला कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे काँग्रेसने डिसेंबर महिन्यात राहुल यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेची मागणी उचलून धरली होती. पक्षाने याप्रकणी गृह मंत्रालयाला देखील पत्र लिहिले होते. याला उत्तर देताना सीआरपीएफने सुरक्षेचे नियम स्वत: राहुल पाळत नसल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांनी 100 हून अधिक वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा : Namaz In Rahul Gandhi Rally : राहुल गांधींच्या रॅलीत महिलेने अदा केली नमाज, म्हणाली राहुल गांधी..

Last Updated : Jan 19, 2023, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.