ETV Bharat / bharat

Corona Vaccine: देशात 'या' महिन्यापासून लहान मुलांच्या लसीकरणाला होणार सुरुवात ?, AIIMS प्रमुखांचे संकेत - Dr Randeep Guleria on Covaxin trials for children

एम्स प्रमुख डॉ रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते, असे संकेतही एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.

Dr Randeep Guleria on Covaxin trials for children

author img

By

Published : Jul 24, 2021, 3:11 PM IST

नवी दिल्ली - एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसाठी व्हॅक्सिनच्या बूस्टर डोसची आवश्यकता आहे. गुलेरिया यांनी म्हटले आहे, की कोविडच्या नव्या व्हेरिएंट्ससाठी बूस्टर डोसची गरज पडू शकते कारण काळानुसार इम्यूनिटी कमजोर होऊ शकते.

भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते, असे संकेतही एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचे पाऊल ठरु शकते. गुलेरिया यांनी सांगितलं की, माझ्या माहितीप्रमाणे जायडस कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची ट्रायलही लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊ शकते. पहिली ट्रायल 12-18 वर्षे वयोगटासाठी केली गेली. त्यानंतर 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवर लसींची ट्रायल केली गेली. आता 2 ते ते 6 वयाच्या मुलांवर ट्रायल केली जात आहे.

जायडसने उपलब्ध केला डाटा -

एम्स प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, जायडस-कॅडिला द्वारा निर्मित लहान मुलांच्या व्हॅक्सिनचा डाटा उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने लहान मुलांच्या लसींना आपतकालीन स्थितीत वापरासंबंधी अर्उज केला आहे. अहमदाबाद येथील कंपनीने तीन डोस असणारी व्हॅक्सिन तयार केली आहे. ती जगातील पहिली प्लाज्माइड व्हॅक्सिन आहे. लवकरच या लसीला डीसीजीआय (DCGI) कडून मंजुरी मिळू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.