नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. देशात सध्या भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लस कोविशिल्ड आणि रशियाची लस स्पूटनिक व्ही या तीन लसींच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. कोव्हॅक्सिन ही कोरोनाच्या सामान्य लक्षणांवर 77 पूर्णांक 8 दशांश टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे.
कोव्हॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचणीचे निष्कर्ष आणि विश्लेषणविषक माहिती भारत बायोटेकनं जाहीर केली आहे. यात त्यांनी कोरोनाच्या सामान्य लक्षणांवर ही लस 77.8 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले. तर कोरोनाच्या डेल्टा या नव्या स्वरुपावर 65 टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केलं आहे.
मानवी चाचणी देशभरातल्या 25 शहरांमध्ये केली गेली होती. लसीच्या मानवी चाचणीमध्ये 18 ते 38 वर्ष वयोगटातले 25 हजार 800 स्वयंसेवक सहभागी झाले होते. कोरोनाच्या तीव्र लक्षणांवर ही लस 93.4 टक्के प्रभावी आहे.
आयसीएमआर आणि बीबीआयएलने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनने एकूण 77 पूर्णांक 8 दशांश टक्के कार्यक्षमता दाखविली, ही आनंददायी बाब आहे. आयसीएमआर आणि बीबीआयएलच्या वैज्ञानिकांनी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी लस देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कोव्हॅक्सिनचा केवळ भारतीय नागरिकांनाच फायदा होणार नाही. तर प्राणघातक जागतिक समुदायाचे रक्षण करण्यासाठीही मोठे योगदान देईल, असे आरोग्य संशोधन विभाग सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक प्रोफेसर (डॉ) बलराम भार्गव म्हणाले. तसेच कोव्हॅक्सिनच्या यशस्वी चाचणीमुळे जागतिक क्षेत्रात भारतीय शैक्षणिक आणि उद्योगांचे स्थान मजबूत झाल्याचेही ते म्हणाले.
अमेरिकेन केले होते लसीचं कौतुक -
भारताने विकसीत केलेल्या 'कोव्हॅक्सिन' लसीचे कौतुक थेट अमेरिकेने केले होते. भारताची 'कोव्हॅक्सिन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी असल्याचे अमेरिकेच्या आरोग्य संस्थेने म्हटलं होते. भारत बायोटक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमानं 'कोव्हॅक्सिन' लस तयार करण्यात आली आहे.