हैदराबाद - भारत बायोटेकने कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकष जाहीर केले आहे. कोव्हॅक्सिन ही कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. डेल्टा व्हेरियंटविरोधात कोव्हॅक्सिन विरोधात ६५.२ टक्के संरक्षण देत असल्याचेही भारत बायोटेकने म्हटले आहे.
कोव्हॅक्सिन ही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तीमध्ये ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे १३० प्रकरणांमधून दिसून आले. तर कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये कोव्हॅक्सिन ही ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून दिसून आले आहे.
हेही वाचा-Raju sapate suicide - कलाक्षेत्रातील कोणाला त्रास दिला तर हातपाय तोडू; मनसेचा इशारा
लस निर्मिती आणि नवसंशोधनाची भारताने क्षमता दाखवून दिली
भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला म्हणाले, की कोव्हॅक्सिनने भारताची लस निर्मिती आणि नवसंशोधनाची क्षमता दाखवून दिली आहे. हे नवसंशोधन भारतामधून असल्याचे सांगताना आम्हाला अभिमान वाटत आहे. ही लस जगभरातील लोकसंख्येला कोरोनापासून संरक्षण करण्याकरिता उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-King of the king; १७६ किलोचा हा बकरा रोज पितो २ लीटर दूध आणि अर्धा किलो तूप
वयोगट २ ते १८ वर्षांसाठी चाचण्या सुरू-
कोव्हॅक्सिनमध्ये सतत सुधारणा करण्यासाठी भारत बायोटेक बांधील असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. त्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय चाचण्या या वयोगट २ ते १८ वर्षांसाठी घेण्यात येत आहे. कोरोनाविरोधात बुस्टर डोस सुरू करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कोरोनाच्या विविध स्ट्रेनवर संशोधन सुरू आहे. कोव्हॅक्सिन ही कोरोनाच्या डेल्टा, कप्पा, अल्फा, बीटा व गॅम्मा या स्ट्रेनविरोधात प्रभावी असल्याचा कंपनीकडून दावा करण्यात आलेला आहे.
हेही वाचा-कोव्हॅक्सीन कोरोनाच्या अल्फा-डेल्टा व्हेरायंटवरही परिणामकारक, अमेरिकेच्या NIH चा दावा
12 महिन्यात नऊ संशोधन प्रकाशित -
भारत बायोटेकने नुकतेच म्हटले आहे की, भारताच्या नियामकांनी कोवॅक्सिन लसीच्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण डेटाचा आणि तिसर्या टप्प्यातील आंशिक डेटाचा काळजीपूर्वक आढावा घेतला आहे. कंपनीने कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेच्या आणि प्रभावीपणाबद्दलच्या पाच जागतिक स्तरावर नामांकित सर्वोत्तम पुनरावलोकन जर्नल्समध्ये गेल्या 12 महिन्यांत नऊ संशोधन आधीच प्रकाशित केले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन ही एकमेव पूर्णपणे कोरोनावरील लस आहे जिने भारतात मानवी चाचणी केल्याचा डाटा प्रकाशित केला आहे.
कंपनीने म्हटले आहे, की भारत बायोटेक ने तीन प्रीक्लीनिकल अभ्यास केले आहेत जे 'सेलप्रेस' या अग्रगण्य समीक्षा जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले. कोव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिक्षण आघाडीच्या समीक्षा जर्नल द लान्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आले.