ETV Bharat / bharat

जाणून घ्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लस निर्मितीचा प्रवास - कोव्हॅक्सिन लस निर्मिती प्रक्रिया

भारत बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि भारतीय विषाणू संस्थाशी (एनआयव्ही) सहकार्य करत लस तयार केली आहे. भारत बायोटेक कंपनीचे मुख्य कार्यालय तेलंगाणातील हैदराबाद शहरात असून येथेच लस निर्मिती करण्यात येत आहे.

Bharat biotech covaxin development
Bharat biotech covaxin development
author img

By

Published : Jan 16, 2021, 8:44 AM IST

हैदराबाद - देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात आजपासून होत आहे. भारतीय बनावटीच्या दोन लसींना सरकारने आणीबाणीच्या वापरासाठी परवाना दिला आहे. सीरम कंपनीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीला हा परवाना मिळाला आहे. भारत बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि भारतीय विषाणू संस्थेशी (एनआयव्ही) सहकार्य करत लस तयार केली आहे. भारत बायोटेक कंपनीचे मुख्य कार्यालय तेलंगाणातील हैदराबाद शहरात असून येथेच लस निर्मिती करण्यात येत आहे.

क्लिनिकल ट्रायलचे दोन टप्पे पूर्ण तिसरा सुरू -

कोव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या झाल्या असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी लसीला परवानगी दिली आहे. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून त्याचे परिणाम समोर आले नाहीत. मात्र, लसीची परिणामकारकता आणि सुरक्षिततेची चाचपणी करत भारत सरकारने कोव्हॅक्सिन लसीला आणीबाणीच्या काळात वापरासाठी परवाना दिला आहे. लसीच्या तिसऱ्या टप्यांतर्गत आता २६ हजार स्वयंसेवकांना लसीची मात्रा देण्यात येत आहे. देशभरातील २५ केंद्रांवर या चाचण्या सुरू आहेत. चाचण्यांचा काही खर्च आयसीएमआरकडून उचलण्यात येत आहे.

निष्क्रिय कोरोना विषाणूपासून लस निर्मिती -

कोव्हॅक्सिन लस निष्क्रिय कोरोना विषाणूपासून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शरिरात प्रतिपिंडे तयार होत असल्याचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतून दिसून आले आहे. सुरूवातीला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत लस तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, या निर्णयावर टीका झाली. लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय घाई करू नये, असा सुरू तज्ज्ञांमधून उमटला होता.

लस निर्मिती प्रक्रिया -

लस म्हणजे एखाद्या आजाराविरोधात व्यक्तीच्या शरिरात प्रतिकार क्षमता तयार करणे. त्यासाठीची प्रतिपिंडे लसीमुळे शरिरात निर्माण होतात. ते विषाणूंचा सामना करतात. कुठलीही लस तयार करण्यासाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, कोरोनावरील लसीसाठी हे काम वेगाने सुरू होते. तसेच चीनने कोरोनाचा जनुकीय अभ्यास जानेवारीतच सुरू केला होता, जेव्हा केवळ चीनमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव होता.

एखादी लस तयार करण्यासाठी सुरूवातीला तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येतो. लस तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यावर सखोल अभ्यास केला जातो. विषाणूच्या जनुकीय रुपाचा अभ्यास तसेच त्यावर संशोधन केले जाते. त्यानंतर लस निर्मितीचे विविध पर्याय पडताळून पाहिले जातात. त्यातील योग्य, सुरक्षित, कार्यक्षम आणि परिणामकारक पर्यायाची निवड करण्यात येते.

सुरुवातीला प्राथमिक चाचण्या घेण्यात येतात. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरच क्लिनिकल चाचणीला परवानगी देण्यात येते. यामध्ये मानवाला लसीचा डोस दिला जातो. यासाठी योग्य त्या स्वयंसेवकांची निवड केली जाते. पहिल्या टप्यात कमी जणांवर लसीची चाचणी केली जाते. चाचणी केल्यानंतर स्वयंसेवकांवर लसीच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात येतो.

जर काही त्रुटी किंवा कार्यक्षमतेबाबत अडचणी असतील तर त्या दुर केल्या जातात. स्वयंसेवकांवर गंभीर परिणाम जाणवले तर चाचणी थांबविण्यातही येते. याचप्रमाणे दुसरा टप्पा पार पडतो. मात्र, यामध्ये स्वयंसेवकांची संख्या वाढवण्यात येते. तिसऱ्या टप्प्यात आणखी स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यात येते. क्लिनिकल ट्रायलचे तिन्ही टप्पे पार केल्यानंतर अहवाल आणि माहितीचा अभ्यास करून पुन्हा लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासली जाते. लसीसाठी मंजुरी आणि परवाना मिळण्याचा चौथा टप्पा असतो.

७० कोटी लसींचे उत्पादन शक्य

भारत बायोटेक सध्या चार नवे उत्पादन प्लांट तयार करत आहे. यातून एका वर्षात तब्बल ७० कोटी लसींचे उत्पादन शक्य आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या कंपनीच्या हैदराबादमधील प्लांटमध्ये वीस कोटी लसींचे उत्पादन (वार्षिक) घेण्याची क्षमता आहे. तसेच, देशात इतर शहरांमध्येही आम्ही उत्पादन करण्यासाठी प्लांट उभारत आहोत, ज्यांची एकत्रित क्षमता ५० कोटी लसींचे उत्पादन घेण्याची असेल, असेही कृष्णा यांनी स्पष्ट केले. सध्या आमच्याकडे २० कोटी डोस तयार आहेत. २०२१ च्या डिसेंबरपर्यंत आमच्याकडे ७६ कोटी डोस तयार असतील, असेही त्यांनी सांगितले आहे.

नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीवर काम सुरू -

कोरोना लस आता नाकाद्वारे घेण्यासही लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंट्रानसल (नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या) लसीच्या चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू करणार आहे. कंपनीने आज यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. पोलिओ लसीप्रमाणे कोरोनाची लस नाकाद्वारे घेण्यासाठी भारत बायोटेक कंपनी प्रयत्न करत आहे.

वॉशिंग्टन युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसन सोबत सहकार्य

भारत बायोटेक कंपनी आधीपासून कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस तयार करत आहे. मात्र, आता नसल कोविड व्हॅक्सिनवर कंपनीने काम सुरू केले आहे. या लसीच्या विकासासाठी कंपनीने वॉशिंग्टन युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसनसोबत मिळून काम सुरू केले आहे. नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे क्लिनिकल चाचणी आधीच्या सर्व प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्या असून क्लिनिकल ट्रायलची तयारी आता सुरू आहे. प्राथमिक चाचण्या भारत आणि अमेरिकेत घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. आता लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.