ETV Bharat / bharat

Bharat Bandh : 'अग्निपथ'विरोधात आज 'भारत बंद'ची हाक, आरपीएफ आणि जीआरपी हाय अलर्टवर - Agnipath scheme protest reason

अग्निपथ योजनेच्या ( Agneepath Scheme ) निषेधार्थ आज तरुणांनी भारत बंदची ( Agitation Against Agneepath Scheme ) हाक दिली आहे. यादरम्यान हिंसक निदर्शने होण्याची शक्यता असल्याने देशातील अनेक राज्यांतील ( Bharat Band Againt Agneepath Scheme ) पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

bharat bandh today
bharat bandh today
author img

By

Published : Jun 20, 2022, 9:25 AM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या अग्निपथ ( Agneepath Scheme ) योजनेबाबत देशभरात सातत्याने निदर्शने होत आहेत. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये ही निदर्शने हिंसक ( Agitation Against Agneepath Scheme ) झाल्याचेही दिसून आले आहे. आंदोलक आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर आता 'भारत बंद'ची हाक ( Bharat Band Againt Agneepath Scheme ) देण्यात आली आहे. याबाबत देशातील सर्व राज्यांतील प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशभरातील अग्निपथ योजनेविरोध आंदोलने सुरू आहेत. अनेक राज्यांमध्ये युवकांचा या योजनेला विरोध आहे. दरम्यान, अग्निपथ योजनेबाबत रविवारी तिन्ही दलाच्या सेना प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत या योजनेबाबत माहिती दिली. तसेच ही योजना मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता आंदोलकांनी सोमवारी भारत बंदची घोषणा केली.

भारत बंदच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आरपीएफ आणि जीआरपी हाय अलर्टवर आहेत. भारत बंद दरम्यान हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हिंसाचार करणाऱ्यांवर गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. भारत बंदच्या घोषणेनंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक कोपऱ्यावर बारीक नजर ठेवली जाईल. आंदोलकांनी हिंसाचार केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. भारत बंद दरम्यान प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. यासोबतच मोबाईल, कॅमेरा, सीसीटीव्हीच्या माध्यमातून हिंसा करणाऱ्यांविरोधात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे आदेश असल्याचेही ते म्हणाले.

भारत बंदमुळे पंजाब पोलिसांचा इशारा- सैन्य भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी संभाव्य भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पंजाबमधील सर्व प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्थांभोवती सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हरियाणात कडेकोट सुरक्षा व्यवस्था - हरियाणात लष्कराच्या अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत फरिदाबाद पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित सर्व तयारी पूर्ण केली आहे. सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आज फरिदाबादमध्ये २ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

झारखंडमध्ये शाळा बंद राहणार - मध्य भारतातही अग्निपथ योजनेला होणाऱ्या विरोधाचा नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. तरुणांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झारखंडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने झारखंडमधील सर्व शाळा सोमवारी बंद राहणार आहेत.

हेही वाचा - Maharashtra monsoon 2022 : संपूर्ण राज्यात व्यापला मान्सून, आजपासून जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.