ETV Bharat / bharat

Crime News : विवाहित महिलेने प्रियकराला चाकूने भोसकले; 'हे' आहे कारण - विवाहित महिलेने आपल्या प्रियकरावर चाकूने वार

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एका विवाहितेने तिच्या प्रियकरावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Bengaluru Crime News
बेंगळुरू क्राइम न्यूज
author img

By

Published : Jul 23, 2023, 4:31 PM IST

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकरावर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना विवेक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून ती आज उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. जोगेश असे पीडित तरुणाचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपी महिला आसामची रहिवासी आहे : बारुथी असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिला विवेक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, पीडित जोगेश आणि आसामची रहिवासी आरोपी महिला, बेंगळुरूमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले. आरोपी महिला डे केअरमध्ये केअर टेकर तर जोगेश सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला तिच्या पतीपासून विभक्त झाली होती.

म्हणून प्रियकरावर केले चाकूने वार : यानंतर तरुण जोगेश आणि आरोपी महिलेमध्ये प्रेम झाले. दोघेही विवेक नगर पोलीस स्टेशन परिसरात राहत होते. तरुणाला त्याच्या प्रेयसीकडून भरपूर पैसे मिळाले होते, मात्र अलीकडे त्याने आरोपी महिलेपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. प्रियकराच्या अशा वागण्याने संतापलेल्या महिलेचे त्याच्यासोबत वारंवार खटके उडत होते. हळूहळू हे भांडण वाढत गेल्याने तिने प्रियकरावर चाकूने वार केले.

पीडितची प्रकृती गंभीर : या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्रियकरावर चाकूने हल्ला केल्यानंतर महिलेने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला ताब्यात घेण्यात आले आहे. जोगेशची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा :

  1. Husband Suicide Case Thane: पत्नीवर संशय, मारहाण पण आत्महत्या मात्र पतीची; जाणून घ्या घटनेचे रहस्य...
  2. GF Killed BF By Snake : पहिल्या बॉयफ्रेंडला संपवण्यासाठी गर्लफ्रेंडने सापाला घेतले सोबत; 'असा' काढला काटा
  3. Delhi Crime News : राजधानी दिल्लीत 'सैराट'सारखा थरार, बापाने मुलीच्या प्रियकराची केली दिवसाढवळ्या हत्या!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.