ETV Bharat / bharat

DATTA JAYANTI 2022 : कशी साजरी करावी 'दत्त जयंती', पूजा-विधी आणि पौराणिक कथा - Wednesday 07 December 2022

दत्त जयंती (DATTA JAYANTI 2022) हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो, याला 'दत्तात्रेय जयंती' असेही म्हटतात. या दिवशी भगवान दत्तात्रयचा जन्म झाला होता. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेली देवता म्हणजे दत्तात्रेय होय. यंदा दत्त जयंती ७ डिसेंबर २०२२ रोजी, बुधवारी (Wednesday 07 December 2022) साजरी होणार आहे.

DATTA JAYANTI 2022
दत्त जयंती
author img

By

Published : Dec 2, 2022, 2:17 PM IST

Updated : Dec 7, 2022, 6:05 AM IST

दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून; हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना, त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनुसया यांचे पुत्र असून त्यांना दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत. सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे 'त्रिमूर्ती दत्त गुरु' मानले जातात. दत्ताची उपासना करण्याचे तीन प्रकार सांगण्यात येतात. गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून ही उपासना होते. यंदा दत्त जयंती ७ डिसेंबर २०२२ (DATTA JAYANTI 2022) रोजी, बुधवारी साजरी (Wednesday 07 December 2022) होणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठीकाणी 'दत्त जयंती' उत्साहात साजरी केली जाते.

दत्ताचे स्वरूप : दत्तात्रेय ही तीन शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो. स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. दत्त्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम आदी संतांनी दत्तांचया त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे.

DATTA JAYANTI 2022
दत्त जयंती

पौराणिक कथा (mythology story) : दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो. अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. आणि देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.

सहावा अवतार 'दत्तत्रेय' : अजून एक गोष्ट म्हणजे विष्णूच्या २४ अवतारांमधील सहावा अवतार भगवान 'दत्तत्रेय' होय. दत्तात्रेयाविषयी नाथ, महानुभाव व वारकरी या संप्रदायांत नितान्त आदर व श्रद्धाभाव आहे. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूच्या २४ अवतारांमधील सहावा अवतार मानला जातो. दत्तात्रेय असाच एक अवतार आहे, ज्यांनी २४ गुरूंकडून शिक्षण घेतले. महाराज दत्तात्रेय आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून, जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

DATTA JAYANTI 2022
दत्त जयंती

दत्त जयंती पूजा व विधी (Pooja and Ritual) : चौरंग मांडून त्यावर लाल कपडा टाकावा. त्यावर श्री दत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. यानंतर श्री दत्ताचे आवाहन करावे. एक तांबा भरुन पाणी जवळ ठेवावे. उजव्या हातामध्ये एक फुल आणि थोड्या अक्षदा घेऊन या मंत्राचे उच्चारण करावे. 'ऊँ अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:, श्री दत्त परमात्मा देवता:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:।' त्यानंतर फुल आणि अक्षता अर्पण करुन या मंत्राचे उच्चारण करावे - 'जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम। सर्व रोग हरं देव, दत्तात्रेयमहं भज॥'

गुरुचरित्राचे पारायण (Benefits of Gurucharitra Parayana) : श्री दत्ताची पूजा, धूप, दीप व आरती करावी. ऊँ द्रां दत्तात्रेयाय नम: या मंत्राने एक जप माळ करावी. या दिवशी भजन, किर्तन आयोजीत करता येतात. या दिवशी दत्त गुरुंना सुंठवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वाटप करावा. दत्ताला पिवळे फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी. या दिवशी अवधूत गीता पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. गुरुचरित्राचे पारायण सात दिवसांआधी वाचणे सुरु करुन, त्याची समाप्ती 'दत्त जयंतीच्या' दिवशी केली जाते.

श्री दत्तात्रेय मंत्राचे फायदे : (Shri Dattatreya Mantra Labh) श्री दत्तात्रेय मंत्रांचा नियमित जप केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या इच्छित भौतिक वस्तू आणि संपत्ती प्राप्त होते. श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे होते. चिंता किंवा अज्ञात शक्तीपासुन भीती मुक्त होण्यासाठी दत्तात्रेय मंत्र चमत्कारिकरित्या कार्य करतं. अशुभ ग्रहांमुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप (Benefits of Mantra for Datta Jayanti) करावा.

Last Updated : Dec 7, 2022, 6:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.