रायपूर - भारत आणि न्यूझिलंड दरम्यान दुसरा क्रिकेट सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी पोलिसांनी गुंडांच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी ताजनगर, मठपुरैना, बोरिया खुर्द, संतोषी नगर, डीडी नगर, इराणी डेरा येथून गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 160 गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुंडांची काढली मिरवणूक : भारत आणि न्यूझिलंडच्या दरम्यान होणाऱ्या मॅचच्या सामन्याच्या पूर्वी पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या गुंडांची शोधमोहीम सुरू केली आहे. पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत. रायपूर पोलिसांनी दिलीप मिश्रा, मुकेश बनिया, लेडी डॉन मुस्कान रात्रे आणि मेहंदी हसनसह अनेक कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या गुंडांची पोलिसांनी शहरातून मिरवणूकही काढली आहे.
21 जानेवारीला सामना : हैदराबाद येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझिलंडवर मात केली होती. हैदराबादमध्ये मिळवलेल्या यशाने भारताचे पारडे जड आहे. तर दुसरीकडे न्यूझिलंड संघही मालिकेत बराबरी करण्यास उत्सुक आहे. आता आगामी सामना 21 जानेवारीला रायपूरला होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ रायपूरला 19 जानेवारीला सायंकाळी 04.35 ला पोहोचणार आहे. रायपूर पोहोचल्यानंतर दोन्ही संघ विमानतळावरुन सरळ कोर्टयार्ड होटेलवर जोणार आहेत. त्यानंतर दोन्ही संघाची सराव सामना 20 जानेवारीला खेळवला जाणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीला दुपारी 01.30 ते 08.30 च्या दरम्यान भारत आणि न्यूझिलंड दरम्यान दुसरा सामना होणार आहे.
लेझर शोचा रोमांच : भारत आणि न्यूझिलंडच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यावेळी क्रीडाप्रेमींची प्रचंड गर्दी होणार आहे. हा सामना दुपारी 01.30 ते रात्री 08.30 च्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे या सामन्यावेळी क्रीडाप्रेमींसाठी खास लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या लेझर शोचे आयोजन एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान होत असल्याची माहिती छत्तीसगड स्टेट क्रिकेट संघाचे माध्यम प्रभारी राजेश दवे यांनी यावेळी दिली.
असे आहे वेळापत्रक : भारत आणि न्यूझिलंडदरम्यान पहिला एकदिवसीय सामना हैदराबाद येथे बुधवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली. तर दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला रायपूरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना दुपारी 01. ते 08.30 च्या दरम्यान होणार आहे. 24 जानेवारीला तिसरा एकदिवसीय सामना इंदूरला खेळवण्यात येणार आहे. हा सामनाही दुपारी 01.30 ला सुरू होणार आहे. तर या मालिकेतील पहिला टी20 मॅच 27 जानेवारीला रांचीमध्ये सायंकाळी 07.00 वाजता खेलवण्यात येणार आहे. दुसरा सामना लखनऊ येथे 07.00 वाजता सुरू होणार आहे. तर तिसरा सामना 01 फेब्रुवारीला अहमदाबादला सायंकाळी 07.00 वाजता सुरू होणार आहे.