नवी दिल्ली - गुजरात दंगलीवर बनवलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संशयास्पद भूमिका दाखवली आहे. बीबीसी डॉक्युमेंटरीचा मुद्दा इमरान हुसैन यांनी ब्रिटीश संसदेत उपस्थित केला होता. त्यावर गुजरात दंगलीवर बनवलेल्या डाक्युमेंटरीशी सहमत नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही कोणाच्याही कैरेक्टेराइजेशनशी सहमत नसल्याचेही सुनक यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवले संशयास्पद भुमिकेत : पाक वंशाच्या खासदाराने संसदेत बीबीसीने गुजरात दंगलीवर बनवलेली डाक्युमेंटरीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर ऋषी सुनक यांनी आम्ही कोणत्याही अन्याय अत्याचाराचे समर्थन करत नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. मात्र आता जो मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला त्याच्याशी आपण सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुशे ऋषी सुनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव केल्याचेच म्हटले जाते.
इमरान हुसैन यांनी केले बीबीसी डाक्युमेंटरीचे समर्थन : बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे पाकिस्तानी वंशाचे खासदार इमरान हुसैन यांनी समर्थन केले होते. त्यावर ऋषी सुनक यांनी स्पष्ट भुमीका घेतली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव केला. बीबीसी डॉक्युमेंटरीपासून त्यांनी स्वतःला दूर केले. डाक्युमेंटरीमध्ये चित्रण केलेल्या व्यक्तीरेखेशी ते सहमत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटनच्या संसदेत मांडलेल्या बीबीसीच्या डाक्युमेंटरी सुनक यांनी भाष्य केले.
ब्रिटन सरकारची भूमिका स्पष्ट : ऋषी सुनक यांनी ब्रिटन सरकारची याबाबतची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. ही भुमीका दीर्घकाळाची असल्याचेही ते म्हणाले. त्यात कोणताही बदल झालेला नाही. आम्ही कोणावरील अन्याय सहन करत नाही. पण सध्या माझ्यासमोर जो मुद्दा मांडला त्याच्याशी आपण सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा तर प्रचाराचा भाग : गुजरात दंगल घडली तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र हा प्रचाराचा एक भाग असल्याची प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्र सचिव अरिंदम बागची दिली. 2002 च्या गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंटरीमध्ये पक्षपातीपणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या डाक्युमेंटरीमध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले. बीबीसी डॉक्युमेंटरीवरील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चुकीच्या माहितीवर ही डाक्युमेंटरी बनवली असल्याचे सांगितले.
हेही वाचा - PM Modi In Mumbai : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा अभूतपूर्व विकास -पंतप्रधान