नवी दिल्ली - जर तुम्ही या आठवड्यात काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील विविध शहरांमधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका गुरुवारपासून सुमारे पाच दिवस बंद राहणार आहेत. बँक सुट्टी एकाच वेळी सर्व राज्यांना लागू होत नाही. आजपासून सलग 5 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या वेबसाइटनुसार, नोव्हेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यात सणांमुळे अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
दिनांक | राज्य | सण |
3 नोव्हेंबर | बंगळुरू (कर्नाटक) | नरक चतुर्दशी |
4 नोव्हेंबर | कर्नाटक वगळता सर्व राज्य | दिवाळी (लक्ष्मी पूजन) |
5 नोव्हेंबर | अहमदाबाद, कानपुर, गंगटोक, जयपूर, देहराडून, नागपूर, बंगलुरू, बेलापूर, मुंबई आणि लखनऊ | दिवाळी (बली प्रतिपदा) |
6 नोव्हेंबर | इंन्फाल, कानपूर, गंगटोक, लखनऊ आणि शिमला | भाऊबीज |
7 नोव्हेंबर | सर्व राज्य | रविवार |
3 नोव्हेंबर 2021 रोजी म्हणजे आज नरक चतुर्दशीनिमित्त कर्नाटकातील बँका बंद राहणार आहेत. तर 4 नोव्हेंबरला दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन)/दीपावली/काली पूजा या निमित्ताने कर्नाटक वगळता सर्व राज्यातील बँका बंद राहतील. तर 5 नोव्हेंबरला बली प्रतिपदेच्या दिवशी गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान आणि महाराष्ट्रात बॅका बंद राहतील. तर 6 नोव्हेंबरला भाऊबिजच्या निमित्ताने सिक्कीम, मणिपूर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये बँका सुट्टी असतील. तर 7 नोव्हेंबरला साप्ताहिक सुट्टी (रविवार) आहे.
मध्यवर्ती बँकेच्या कॅलेंडरनुसार, बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार भिन्न असतात. सुट्टीच्या दिवशी बँकिंग कामकाज बंद राहिल. परंतु ग्राहक ऑनलाइन बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतात.