लखनौ - कोरोना महामारीत मास्क न घालणाऱ्यांवर सरकारकडून प्रसंगी कठीण कारवाई होते. मात्र, उत्तर प्रदेशमधील बरेल्ली जिल्ह्यातील बँकेच्या सुरक्षा रक्षकाने मास्क न घालणाऱ्या व्यक्तीवर थेट बंदुकीची गोळी झाडली आहे. राजेश कुमार असे घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बरेल्लीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकाने गोळी मारलेला बँकेचा ग्राहक हा रेल्वेचा कर्मचारी आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा-भाजपाकडून चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत - गृहमंत्री वळसे-पाटील
जखमी झालेल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
हेही वाचा-अनिल देशमुखांवरील कारवाई संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...