ETV Bharat / bharat

Bajrang Dal Warning : बजरंग दलाची तरुणांना वॉर्निंग, आता गरबा पंडालांमध्ये ओळखपत्र आवश्यक - इंदूर बजरंग दल वॉर्निंग

इंदूरमधील गरबा पंडालमध्ये ओळखपत्र नसलेल्यांना प्रवेश दिला जात नाही आहे. इंदूरच्या प्रत्येक गरबा पंडालमध्ये प्रथम लोकांना ओळखपत्र दाखवावे लागते, त्यानंतरच त्यांना पंडालमध्ये जाण्याची संधी मिळत आहे (indore garba pandal identity checking). बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काही गैर-हिंदू मुलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत पोलिसांकडून हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे (Indore Police Helpline Number).

Bajrang Dal Warning
बजरंग दलाची गैर-हिंदू तरुणांना वॉर्निंग
author img

By

Published : Sep 30, 2022, 12:29 PM IST

इंदूर: मंत्री उषा ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर आता मध्य प्रदेशातील सर्व गरबा पंडालमध्ये ओळखपत्राची तपासणी केली जात आहे (indore garba pandal identity checking). त्याचवेळी बजरंग दलाने गैर-हिंदू तरुण जर गरबा पंडालमध्ये दिसले तर ते जरी दोन पायांवर आले, तरी जाताना चार खांद्यावर जातील, असा गर्भित इशारा दिला आहे (Bajrang Dal Warning). या अनुषंगाने आता आयोजकांना ओळखपत्र देऊनच गरबा पंडालमध्ये प्रवेश दिला जात आहे. आज बजरंग दलाने आणखी एका गैर-हिंदू तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

बजरंग दलाची गैर-हिंदू तरुणांना वॉर्निंग

बजरंग दलाने शहरात तपासणी मोहीम राबवून आत्तापर्यंत 7 गैर-हिंदू तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रावजी बाजार परिसरात तपासणी मोहीम राबवून एका गैर-हिंदू तरुणाला पकडले. बजरंग दलाचे विभाग समन्वयक तनू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध भागात कार्यकर्त्यांकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवली जात आहे. आता गरबा पंडालचे आयोजकही सतर्क दिसत असून स्वत: ओळखपत्र दाखवूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही त्यांना गेटवरूनच माघारी पाठवले जात आहे. आयोजकांनी ठिकठिकाणी विविध गरबा पंडालवर कार्यकर्त्यांना उभे केले असून गरबा पंडालमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होते आहे.

आदल्या दिवशीही गैर-हिंदू तरुण पकडले गेले: आदल्या दिवशी इंदूरमधील गरबा पंडालमध्ये काही तरुणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले होते. मात्र त्यानंतरही अनेक भागात गैर-हिंदूंचा प्रवेश सातत्याने होतो आहे. लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पाहता इंदूरच्या बजरंग दलाचे संयोजक तनू शर्मा यांनी बिगर हिंदू तरुणांना गरबा पंडालपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी तपासणी करून अटक केलेल्या तरुणांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव हिंदू असल्याचे सांगितले, मात्र ओळखपत्र दाखवण्यास सांगितले असता ते घाबरले आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी जारी केला हेल्पलाइन क्रमांक: इंदूरचे पोलिस आयुक्त हरिनारायणचारी मिश्रा यांनी काही ठिकाणी तुरळक घटना समोर आल्याचे सांगितले. मात्र शहरात ज्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे त्याबाबत पोलिसांमध्ये सतर्कता असून विविध भागात सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जिकडे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, तेथे परस्पर सलोखा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच पोलिसांकडून हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.