ETV Bharat / bharat

Hotel Taj Convention Center Connection : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन संशयित पदाधिकाऱ्यांना अखेर जामीन मंजूर - श्रेय कोटीयाल

तोतयागिरीचा संशय तसेच बनावट ओळखपत्राच्या आधारे ताज हॉटेलमध्ये ( Hotel Taj Convention Center ) वास्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना (Two office bearers of NCP ) गोवा पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गेल्या दोन दिवसांपासून हॉटेल ताज कन्वेन्शन सेंटरमध्ये वास्तव्य करीत होते. अखेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर ( Bail granted ) झाला आहे.

Two office bearers of NCP )
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकारी
author img

By

Published : Jul 3, 2022, 5:02 PM IST

गोवा : बनावट कागदपत्रांच्या आधारे शिवसेनेचे बंडखोर आमदार ( Shiv Sena's rebel MLA ) असणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना (Two office bearers of NCP ) गोवा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली होती. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना रविवारी कोर्टाकडून जामीन मिळाला ( Bail granted ) आहे. सोनिया दोहान आणि श्रेय कोटीयाल, अशी त्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. दोघेही मागच्या दोन दिवसांपासून पणजीतील ताश कन्वेंशन सेंटरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करीत होते.

राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर

हाॅटेलमध्ये करीत होत तोतयागिरी : हाॅटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार राहायला होते. हेरगिरी व तोतियागिरी केल्याचा आरोप ठेवत या दोघांनाही पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले होते. यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीर मंजूर केला. वीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला असून, पुढचे चार दिवस त्यांना गोवा न सोडण्याचे आदेश देण्यात आले.

संशयावरून गोवा पोलिसांकडून अटक : महाराष्ट्राचे आमदार तळ ठोकून होते त्या डोना पॉला येथील हॉटेलमध्ये तोतयागिरी करून तपासणी केल्याच्या संशयावरून गोवा पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. पणजी पोलीस निरीक्षक सूरज गवस यांनी सांगितले की, हरियाणातील एक आणि उत्तराखंडमधील दोन जणांना तोतयागिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की ते डोना पॉला येथील तारांकित हॉटेलमध्ये एक दिवस राहत होते.

पोलीस तपासात आणखी माहिती मिळण्याची शक्यता : योगायोगाने हे तेच हॉटेल आहे जेथे महाराष्ट्राचे आमदार तळ ठोकून होते. परंतु, दोन्ही घटनांचा संबंध आहे की नाही? हे तपासात उघड होईल, असे गवस म्हणाले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, दोघेही रिसॉर्टमध्ये तोतयागिरी करत असल्याचा संशय आल्याने त्यांना अटक करण्यात आले. 29 जूनपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह इतर अपक्षांनी तेथे चेकइन केल्याने गोवा पोलिसांनी रिसॉर्टमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता. गुवाहाटीहून हा ग्रुप रिसॉर्टमध्ये आला होता.

हेही वाचा : Two NCP office bearers arrested : बंडखोर आमदार वास्तव्यास राहिलेल्या हॉटेलमध्ये तोतयागिरी? राष्ट्रवादीच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.